रोहा मनसेत कार्यकर्त्यांची इनकमींग सुरूच : तांबडीतील युवकांचा प्रवेश
सिटी बेल | धाटाव रोहा | शशिकांत मोरे |
मुंबईत कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते रोहे तालुक्यातील अमोल पेणकर यांची जिल्हा सचिव तर अक्षय रटाटे यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा आता मनसे पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे.नुकतेच घोसाळे विभागातील तांबडी बुद्रुक येथील युवकांनी प्रस्तावित सत्ताधारी पक्षांकडे पाठ फिरवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे.शहरातील संपर्क कार्यालय,नविन पदाधिकारी नियूक्ती यामुळे एकूणच रोहे तालुका मनसे मध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
आगामी काळात गाव तेथे शाखा हा उपक्रम जिल्हा संपर्क नेते दिलीप सांगले व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली राबवत घराघरात राज साहेब ठाकरेंचे विचार पोहोचवण्याचा मानस सर्वच मनसैनीकांच्या मधून व्यक्त झाला.
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधारी पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातील महाआघाडी सरकार फॉर्म्युल्या मुळे कोण कोणकोणासोबत असेल हे काळच ठरवेल. मात्र रोहेसह जिल्ह्यातील भाजपा व मनसे यांची भूमिका काय असेल यावरच सगळ्यांचे लक्ष आहे.यामध्ये आता रोहे तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकून पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील युवा पदाधिकाऱ्यांना पक्षाने संपूर्ण ताकद दिल्यामुळे आता युवकांसह नागरिकांचा ओढा मनसे कडे वाढत आहे.याचीच प्रचिती तांबडी येथिल पक्षप्रवेशावरुन येत आहे.ग्रामपंचायत पासून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे.
दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवैंद्र गायकवाड, जिल्हा सचिव अमोल मधुकर पेणकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष प्रवेशा दरम्यान तांबडी येथील संजय कदम ,देवानंद चव्हाण. सुमित कदम,विठोबा घडशी,शिरीष सुरेश कदम,चंद्रकांत वारगुडे,संतोष नायणेकर,विनोद पाते, निलेश शितप, रुपेश माळकर,सुदेश पडयाळ,मनोहर गोरे,पांडुरंग जीवले, आकाश आग्री, किसन जाधव,रोहन घोरपडे,साहिल बावकर,राकेश जानू, जिनगरे,दीपक गायकर,रवी माचीवले (घोसाळे.) राघो गडखळ,नरेश वारगुडे,
मंगेश वारगुडे,अजय कदम, आनंद गडखळ, अजय म्हसकर,श्रियाल रयराशी.( तांबडी खुर्द.)आदी शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात मनसेची ताकद अशीच वाढत जात तालुक्यातील राजकीय समिकरणात मनसेची दखल सर्वांनाच घ्यावी लागणार असेच चित्र आता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान झालेल्या पक्ष प्रवेश प्रसंगी रोहे तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे , रोहा तालुका महिलाध्यक्षा दिपश्री घासे , तालुका सचिव साईनाथ धुळे ,माणगांव तालुकाध्यक्ष प्रतीक राहटे. रोहे शहराध्यक्ष मंगेश रावकर , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment