Press "Enter" to skip to content

भय इथले संपत नाही…

बोअर ब्लास्टिंगमुळे नागरीकांच्या जिवतीतास धोका स्थानिक रहिवाशांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील खरोशी गावाच्या हद्दीत कोणतीही दक्षता न घेता मोठ्या प्रमाणात दगडखाण खनिज उत्पादन करिता खाजगी कंपनीकडून बोअर ब्लास्टिंगचे काम सुरू असल्याने या ब्लास्टिंगमुळे येथील स्थानिक रहिवाशांच्या घरांना तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रार धनाजी पुंडलिक भगत यांनी राज्य शासनासह कोकण आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार यांचेकडे लेखी स्वरूपात दाखल केली असल्याची माहिती त्यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील मौजे खरोशी येथील गट क्रमांक क्षेत्रात बोअर ब्लास्टिंगचे काम सुरू असून यामुळे येथील रहिवाशांना तसेच घरांना हादरे बसून तडे जात आहेत याबाबत अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र याकडेे प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याने अखेर येथील रहिवासी तक्रारदार धनाजी भगत यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री यांच्यासह कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी खनीजकर्म विभाग, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली असता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे व उचित कार्यवाहीचे आदेश देखील पेण तहसीलदार यांना दिलेले आहेत मात्र संबंधित तहसिलचे अधिकारी अंमलबजावणी करणे कामी वेळकाढूपणा करीत आहेत.

त्यामुळे कोणतीही दक्षता न घेता हे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या बोअर ब्लास्टिंगमुळे या भागातील आदिवासी समाजातील नागरीकांच्या जीवितास देखील धोका निर्माण झालेला आहे.मागच्या अनेक वर्षापासून येथील आदिवासींचा हाच मार्ग आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करण्यापायी पायी चालत तर काही तरुण मंडळी मोटारसायकलने प्रवास करीत असल्याने या बोअर ब्लास्टिंगमुळे सदर परिसर घातक बनला आहे त्यामुळे सदर होणारी बोअर ब्लास्टिंग तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा याकरीता आम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावे लागेल असा इशारा तक्रारदार धनाजी भगत यांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.