महागाई विरोधात कॉंग्रेसच्या जनजागरण अभियानाला पेण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
केंद्र सरकारने वाढविलेल्या वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून यामुळे गोर गरीब, कष्टकरी, श्रमजीवी, आदिवासी, शेतकरी या सर्व स्तरातील नागरीकांना या महागाईचा सामना करावा लागत असल्याने या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली १४ ते १९ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर अभियान सुरू झाले असल्याने या अभियानात पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून शहरातील व्यापारी वर्गांने मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शहरातील नगरपालिका चौक, एसटी स्थानक, रायगड बाजार, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांना केंद्र सरकारने वाढविलेल्या गॅस, पेट्रोल डिझेल, डाळ, खाद्यतेल, भाजीपाला या वस्तूंवरील भाववाढ विरोधात जनजागृती करून नागरीकांनी या निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेपासून खाली खेचावे असे आवाहन यावेळी पेण शहर व तालुका काॅग्रेसच्या वतीने करण्यात आले.सदर जनजागरण अभियानाची सुरुवात पेण गागोदे येथून करण्यात आली असुन तालुक्यातील गागोदे बुद्रुक, वरसई, जावळी, करोटी, आष्टे, जैतूचीवाडी, घोटे, आराव, वाकरुळ, कामार्ली, सापोली, धामणी आदि ग्रामिण भागात केंद्र सरकारच्या या भाववाढी विरोधात निषेध करण्यात आला.
कॉग्रेसच्या या जनजागरण अभियानात प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी सभापती सदानंद म्हात्रे, हितेन जैन, सनिल खोजा, नीलेश तांबोली, शशिकांत भोईर, आबा भोईर, कांचन म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, हिदू कुँवारे, नीलकंठ पवार, रामधरने, अविनाश भोईर, रमेश भोईर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment