अबब… घरात शिरला चक्क सहा फूट लांब नाग : वाचा काय झाले पुढे ?
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील पुगांव येथे राहत्या घरात सहा फुट लांब असलेल्या नाग जातीच्या सापाला पकडून जीवदान दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार पुगांव येथील रहिवासी असणारे शुभम शेडगे यांच्या राहत्या घरात साप शिरला असल्याची माहिती कोलाड विभागातील सर्पमित्र अजय राजिवले यांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेऊन विषारी नाग जातीच्या सापास सुरक्षितपणे पकडले.
पकडलेला साप हा नाग जातीचा विषारी साप असल्याचे त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. तर शुभम शेडगे यांच्या घरात अत्यंत अडचणीच्या जागी लपून बसलेल्या सहा फुटी नागास अजय राजिवले यांनी मोठ्या शिताफिने पकडून त्यास जीवदान देऊन जंगलभागात सुरक्षितपणे सोडले.दरम्यान सर्पमित्र अजय राजिवले याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment