Press "Enter" to skip to content

सिसिटिव्ही कॅमेरा भेट

रसायनी पोलिस स्टेशनला सिसिटिव्ही कॅमेरा संच भेट

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी केलेल्या मागणीला स्थानिक नेते सुरेशदादा पाटील यांनी आपल्या स्वखर्चांने सिसिटिव्ही कॅमेरा सेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले.

रसायनी परिसर हा औद्योगिककरणाने विखुरला आहे,येथे काही अनुचित प्रकार जसे की अपघात,चोरी अशा घटना घडत असतात. अशा वेळी त्या घटना घडल्यानंतर गुन्हेगार त्यातुन सुटून जाऊ नये म्हणून पाळत ठेवण्याकरिता सिसिटिव्ही कॅमे-याची आवश्यकता असल्याचे रसायनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांची मागणी होती.या मागणीला अनुसरून माजी उपसरपंच सुरेश पाटील यांनी त्वरित आपल्या स्वखर्चाने रसायनी पोलीस स्टेशन ला सिसिटिव्ही ४ कॅमे-यांचा संच पोलिस नाईक विशाल झावरे यांच्याकडे पोलिस स्टेशनला जावून दिले. हे कॅमेरे लोहोप येथील नाक्यावर बसविण्यात येणार आहेत.

याप्रसंगी वडगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच संतोष ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, प्रमोद ठोंबरे, पोलिस नाईक विशाल झावरे,पोलिस नाईक बैकर व पोलिस नाईक पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.