विश्व हिंदू परिषद-बजरंग दल कर्जत प्रखंडाच्या वतीने रक्तदान शिबिरात 85 रक्तदात्यांचे रक्तदान
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
गीता जयंती शौर्य दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद-बजरंग दल कर्जत प्रखंडाच्या वतीने घटकोपरच्या समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कर्जत – खालापूर तालुक्यातील 436 वे रक्तदान शिबिर होते.
कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन आरोग्यभारती चे राष्ट्रीय महासचिव डॉ सुनील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, कुलाबा जिल्हा बजरंग संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत नगर परिषद उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, नगरसेवक बलवंत घुमरे, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रभाकर करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांनी रक्तसंकलन केले.








Be First to Comment