आवरे गावातील राम पाटिल यांचे दुःखद निधन
सिटी बेल | आवरे | अविनाश गावंड |
आवरे गावातील प्रतिष्ठीत नागरिक मित भाषी ,मृदू स्वभाऊ , मनमिळाऊ , सर्वांशी मिळून मिसळून असणारे , सोज्ज्वळ असे व्यक्तिमत्त्व , राम पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
सर्वपरिचित असणारे राम पाटील यांनी मातृभूमी आवरे असली तरी संपूर्ण आयुष्य हे व्यावसायिक नोकरीनिमित्त ठाणे येथे घालविले तसेच आताच्या काळात उरण मध्ये व्यावसायिक नोकरी केली अश्या पद्धतीने कुटुंबाचे मोजक्या आर्थिक उत्पन्नत घर चालविले राम पाटील यांचा दशविधि क्रिया शुक्रवार दिनांक 21 /11/2021रोजी आवरे गावतील दक्षिण काशी ब्राम्हण देव मंदिर येथे होणार आहे तसेच उत्तरक्रिया ही रविवार दिनांक 21 /11/2021 रोजी राहत्या घरी होणार आहे.
राम पाटील यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखच डोंगर कोसळला आहे ते सहनकरण्याची ताकत परमेश्वर देवो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना त्यांच्या पश्चात दोन भाऊ , पत्नी एक मुलगा , सुना दोन मुली नातवंडे असा परिवार आहे कुणीही दुखावटा अनु नये असे परिवाराने नातलग यांना आवहन केले आहे.








Be First to Comment