Press "Enter" to skip to content

जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

विक्रांत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उगवता तारा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

सिटी बेल | पनवेल |

विक्रांत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उगवता तारा असल्याचे गौरवोद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पनवेल येथे काढले.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष तथा पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे पनवेल येथे भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न झाले.
यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर रायगडचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,म्हाडा चे माजी कोकण अध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस सुशिल मेंगडे, सभागृह नेते परेश ठाकूर,नगरसेवक नितीन पाटील यांच्या सह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, युवा मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी विक्रांत पाटील अगदी चोख पद्धतीने पार पाडत आहेत, त्या निमित्ताने राज्यभर फिरत असताना देखील त्यांनी त्यांच्या प्रभागा कडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही याचे मला कौतुक वाटते. प्रसन्न आणि पारदर्शक अशी कार्यालयाची वास्तु अत्यंत प्रेक्षणीय झाली आहे.या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण निरंतर होवो अशी मी शुभेच्छा देतो.

चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढे सांगितले की, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ने 284 जागा मिळवल्या,2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 303 जागा मिळवून दाखवल्या.2024 आली भारतीय जनता पार्टी 418 जागा मिळवून दाखवेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असताना डोळ्यापुढे ध्येय आणि टप्पे ठेवून मार्गक्रमण करत असतात.पहिल्या टर्म च्या पाच वर्षात त्यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यावरती जोर दिला.पुढच्या टर्म मधील पहिल्या टप्प्यात त्यांनी काश्मिरातून कलम 370 आणि 35 A रद्द करणे, अयोध्या मध्ये राम जन्मभूमी मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करून देणे, तिहेरी तलाख विरोधात कायदा निर्माण करणे.अशा बहुप्रतिक्षित आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सहजसाध्य करून दाखविल्या.निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणणे हे भाजपाचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी साध्य करून दाखवतील.

आपल्या भाषणात शिवसेना आणि राऊत यांच्यावर ती कडक ताशेरे ओढत असताना सुद्धा चंद्रकांत दादांनी प्रांजळ कबुली दिली की,93 सली झालेल्या मुंबई दंगलींमध्ये आम्ही जर जिवंत राहिलो तर ते केवळ हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच.

या घटना सोहळ्याप्रसंगी नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक मनोहर म्हात्रे,नगरसेवक विकास घरत, नगरसेवक बबन मुकादम, हॅप्पी सिंग,शावेझ रिझवी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यावर आपत्ती ओढवतात तेव्हा आमचे नेते देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत दादा हे तातडीने तिथे पोहोचतात, आपत्तीग्रस्तांना स्वतः मदत मिळवून देतात.आपत्ती व्यवस्थापनाचे जे कार्य मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे ते आमचे नेते करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो.विक्रांत पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे.राज्यातील महा विकास आघाडी सरकारने केलेला बट्ट्याबोळ नागरिकांच्या पर्यंत घेऊन जात असताना त्यांनी अक्षरशः राज्य पिंजून काढले आहे.महा विकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करताना त्यांना पोलिसांनी इतक्या वेळा उचलले आहे, जितके त्यांच्या लहानपणी आई-वडिलांनी देखील उचलले नसेल.

आमदार प्रशांत ठाकूर
अध्यक्ष,उत्तर रायगड जिल्हा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.