शेतपळसचे अनिल डाकी यांची राष्ट्रवादीच्या रोहा तालुका उपाध्यक्षपदी निवड
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील शेतपळस (ता.रोहा) गावातील तरुण तडफदार कार्यकर्ते अनिल महादेव डाकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर यांच्या सहीचे नियुक्ती पत्र अनिल डाकी यांना खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते नागोठण्याजवळील आंबेघर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात देण्यात आले.
यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादीचे विभागीय नेते दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर आदींसह अन्य नेतेगण व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस व रायगड-रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री ना.कु. आदितीताई तटकरे आणि विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांचे पालन करुन संघटना वाढीकरिता अविरत प्रयत्न करतांना मोठ्यांचे आशिर्वाद, सोबत्यांचे मार्गदर्शन व लहानांचे सहकार्य घेत पुढील वाटचाल करावी यासाठी आपल्याला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा असेही या पत्रात म्हटले आहे. या निवडीबद्दल अनिल डाकी यांच्यावर नागोठणे विभागासाह जिल्ह्यातील त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.








Be First to Comment