Press "Enter" to skip to content

वाळीत टाकल्याचा बनाव

नवघर येथील रेशनिंगचा भ्रष्टाचार उघड होत असल्याचे पाहता कुटूंबाने केला वाळीत टाकण्याचा बनाव

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील नवघर येथील रहिवासी देवेंद्र कोळी यांच्या कुटुंबीयांनी मागच्या अनेक दिवसांपासून आम्हाला गावातील ग्रामस्थांनी वाळीत टाकले असल्याची खोटी माहिती प्रशासनाला देत असून यामुळे गावाची नाहक बदनामी सदर कुटुंब करीत आहेत नवघर गावातील ग्रामस्थांनी असे कोणतेही प्रकार केलेले नाही उलट रेशनिंग मधील केलेला भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याचे पाहून सदर कुटुंब हा बनाव करीत असल्याचे गावातील ग्रामस्थांसह पंचकमिटीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

गावातील देवेंद्र मारुती कोळी, गजानन मारुती कोळी, अशोक पांडुरंग कोळी, दत्तात्रेय भवानी कोळी यांनी अनेकदा प्रांताधिकारी, पेण तहसीलदार, पेण पोलिस ठाणे यांच्याकडे गावातील पंच कमिटीने आम्हाला वाळीत टाकण्याचे तक्रारी अर्ज केले आहेत.यामुळे आमच्या गावातील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत असून याबाबत काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार, डीवायएसपी यांच्यासह गावातील दोन्ही अर्जदार पंचकमिटी उपस्थित होते.

त्या बैठकीत गावकऱ्यांनी त्यांची बाजू मांडून होत असलेला सर्व प्रकार प्रशासनाला सांगितला असता सदर बाब ही खोटी आहे.याउलट गजानन कोळी यांची पत्नी बचत गटाच्या नावाने रास्त भाव धान्य दुकान चालवत असून त्या दुकानाचा भ्रष्टाचार बाहेर पडू नये म्हणून सदर कुटुंब आम्हाला वाळीत टाकल्याचा बनाव करुन खोटी माहिती प्रशासनाला देत असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शेवटी सांगितले.

मागच्या अनेक महिन्यांपासून नवघर गावातील पंचकमिटीने आमच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. आमच्या बरोबर गावातील कोणीही व्यक्ती कोणताच व्यवहार करीत नाहीत उलट आमची लहानमुले दुकानात गेली तर ते सर्वांना याबाबत सांगत सुटत आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबाला खुप मनस्ताप झाला असून याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदने, अर्ज, उपोषण केले आहे मात्र प्रशासन आम्हाला न्याय देत नाही
देवेंद्र मारूती कोळी - सदस्य वाळीत कुटुंब

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.