कर्जत काँग्रेसच्या वतीने बाल गोपाळांसह जवाहरलाल नेहरू जयंती साजरी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती कर्जत काँग्रेसच्या वतीने बाल गोपाळांच्या समवेत साजरी केली. यावेळी नेहरूंच्या कार्याची महती सादर करण्यात आली.
आमराई येथील आशीर्वाद सभागृहात कर्जत शहर काँग्रेस समिती व कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय पंडित नेहरूंच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सलोनी हवालदार आणि शौर्य तारगे या लहानग्यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी दीप प्रज्वलन करून उपस्थितांनी पंडित नेहरूंना अभिवादन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, शहराध्यक्ष इरफान अत्तार, सरचिटणीस सुभाष मदन, तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील आदींसह आरुष खाडे, मितांश कारले, आराधना खाडे, धक्रम कदम रेयांश तारगे हे चिमुरडे उपस्थित होते.
यावेळी सुभाष मदन यांनी पंडित नेहरूंच्या कार्याची महती सांगताना, ‘या संगणकाच्या युगात लहान मुलांना आपल्या देशातील थोर पुरुष कोण? यांची माहिती नाही. देशासाठी कुणी बलिदान केले? कोण हुतात्मे झाले हे नवीन पिढीला माहिती असणे आवश्यक आहे.’ असे स्पष्ट केले.








Be First to Comment