जनतेचा विश्वास हीच खरी संपत्ती – वर्षाताई गायकवाड
सिटी बेल | कळंबोली |
आमचे वडील एकनाथजी गायकवाड यांनी जनतेची केलेली सेवा आणि जनतेचा आमच्या वराचा विश्वास हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे आम्ही धारावी मतदार संघ अबाधित ठेवू शकलो. धारावीतील रहिवाशी हे आमचे सर्व कुटूंब आहे. त्यामुळे त्यांना घरे कळंबोलीमध्ये मिळतात त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांच्या आनंदात सामील होताना मला आनंद होत आहे असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले
डी डी एस आर बिल्डर आणि डेव्हलपरच्या
तथागत संकुलानाच्या भव्य दिव्य भूमिपूजन सोहळया निमित्त कळंबोली येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी व्यवसायिक राहूल हजारे यांना ही घरे लवकरात लवकर तयार करून द्या असा सल्ला दिला. यावेळी वर्षातैनी राहुल हजारे व प्रियांका हजारे यांना शाबासकीची थाप दिली.
या कार्यक्रमासाठी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड,नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेविका विद्याताई गायकवाड, काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, तेजस चाफेकर आदी मान्यवरांसह सोसायटीचे सभासद उपस्थित होते. मान्यवरांचे सत्कार सोसायटीचे अध्यक्ष राजेश वाघमारे, बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.








Be First to Comment