ग्रुप ग्राम पंचायत वडगाव यांच्या माध्यमातून तळवली येथे बंदिस्त गटाराच्या कामाचे भूमिपूजन
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
ग्रूप ग्राम पंचायत वडगांव ही विकास कामे करण्यात नेहमीच सातत्याने अग्रेसर असते.नागरिकांच्या समस्या विचारात घेवून त्या पुर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असते.डोंगराच्या कुशित वसलेले तळवली या गावामध्ये नागरिकांची समस्या विचारांत घेवून या गावामध्ये बंदिस्त गटारे बांधण्याचा संकल्प घेण्यात आला.ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे यांच्या हस्ते या बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला.
घरातील सांड पाणी रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी पसरत असते.काही वेळा हेच सांडपाणी अनेक ठिकाणी जमा झाल्यामुळे जंतूची निर्मिती होत असते.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यांना विविध आजार होण्याचा धोका असतो.मात्र तसे होवू नये यासाठी.हे बंदिस्त गटार बांधण्याचे संकल्प करण्यात आला.कित्येक वर्षे राहिलेलं बंदिस्त गटर . भरत नामदेव मालकर यांच्या घरापासून ते.बाळाराम हरी मालकर यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटर तयार करण्यात येणार आहे.
हे काम ग्रामस्थ वर्गाच्या मागणीतून तसेच तळवली गावातील सदस्य .संदेश जगन्नाथ मालकर,.मदन दत्तू ठोबरे तसेच.प्रकाश पवार यांच्या मागणीतून सरपंच .गौरी ताई महादेव गडगे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपूजन यशस्वीपणे पार पडले.यावेळी भूमीपूजन प्रसंगी, सरिता संतोष गडगे, .कल्पना मदन ठोबरे(सदस्या) ,श्रीमती.लता आत्माराम मालकर(अंगणवाडी सेविका संदेश जगन्नाथ मालकर(सदस्य),श्री.शिवाजी शिंदे.मदन दत्तू ठोबरे,.जयराम दामू मालकर, नथुराम मारुती मालकर,.अनंत बापू मालकर,जगन्नाथ कृष्णा मालकर, पंढरीनाथ मालकर,.बाळकृष्ण ठोबरे,कु.दिनेश तुकाराम मालकर,मनोज दत्तात्रेय मालकर ,कु.कुणाल कान्हू मालकर व कॉंट्र्क्टर .अतुल दत्तात्रेय मालकर उपस्थित होते .








Be First to Comment