केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल : श्रीरंग बरगे
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल करून टाकले आहे . त्यांनी देशात महागाईचा आगडोंब उसळवला आहे. लोक महागाईने होरपळून निघाली असून मोदी आणि भाजपाने दरवाढी विरोधात विरोधीपक्षात केलेली आंदोलने आणि भाषणे आठवावीत, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेस एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी अलिबाग येथील बॅ.ए.आर.अंतुले काँग्रेस भवन येथे आयोजित जनजागरण अभियान संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत,महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर, सरचिटणीस चंद्रकांत पाटील,रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर,अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर यांच्यासाहित आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment