Press "Enter" to skip to content

जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्या उद्घाटन

सिटी बेल | पनवेल|

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.उपमहापौर पनवेल विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे रविवार दि-१४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मा.मंत्री आ.रवींद्र चव्हाण, मा.खा.रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ.कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर,सभापती,नगरसेवक आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमा निमित्त संवाद कार्यक्रम विरुपाक्ष हॉल, अशोक बाग,विर सावरकर चौक रोड,पनवेल येथे होणार आहे. जनसंपर्क नव्हे जनसेवा कार्यालय असा मानस ठेऊन विक्रांत पाटील आज पर्यंत सेवा कार्य करीत आले,आता या कार्यालयाचे नूतन रूप अद्यावत करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमास पनवेलकर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.