कर्जत नगरपरिषदेला गार्बेज फ्री सिटी म्हणून मिळाले 3 स्टार
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
रायगड जिह्यातील क वर्गात समावेश असलेली कर्जत नगरपरिषदेला गार्बेज फ्री सिटी म्हणून 3 स्टार मिळाले आहे.

भारत सरकार यांच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचा दिल्ली येथे सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे .

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि सर्व नगर परिषद सदस्य आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केल्याने हे यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.

यासाठी आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे आणि सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली मेहनत घेतल्याने हा नावलौकिक मिळाला आहे.








Be First to Comment