Press "Enter" to skip to content

मालमत्ता कराला तिव्र विरोध

महानगरपालिकेच्या मालमत्ता कराला कळंबोलीकरांचा विरोध : कर न भरण्याचा निर्धार

सिटी बेल | कळंबोली |

आज 11/ 11 /2021 रोजी पनवेल महानगरपालिकेने कळंबोली गावातील नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात नोटीस दिल्याने नगरसेवक गोपाळ भगत, रविंद्र भगत, नगरसेवक विजय खानावकर कळंबोली गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्यासमवेत आज श्री काळभैरव मंदिर या ठिकाणी बैठक संपन्न झाली व सदर बैठकीत ग्रामस्थांनी टॅक्स ला विरोध करत सूचना करण्यात आल्या.

गेले साडेचार वर्षात जे ग्रामस्थ पनवेल महानगरपालिकेला टॅक्स भरत होते त्यास्वरुपात महानगरपालिकेकडून कोणतेही सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेली नाही.त्यामुळे कळंबोली गावातील सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने टॅक्स भरण्यास विरोध केला.यावेळी ग्रामस्थांकडून निर्णय घेण्यात आला जोपर्यंत पनवेल महानगरपालिका पूर्ण पणे सुविधा देत नाही. तोपर्यंत आम्ही कोणताही वाढीव टॅक्स भरणार नाही असा निर्धार करण्यात आला.

सदर विषयी पालिकेने कोणतीही कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थांच्यावतीने महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.