रायगड एस. टी. कर्मचारी आंदोलनाला म. न. से. श्रीवर्धन यांचा जाहीर पाठिंबा
सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व अन्य मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन सहभागी आहे. अशा आशयाचे पत्रक श्रीवर्धन आगार येथे जाऊन तालुका अध्यक्ष सुशांत पाटील, सचिव सुमित सावंत यांनी प्रवीण मोहिते यांच्याकडे दिले .
श्रीवर्धन सारख्या डोंगराळ दुर्गम भागात इतर खाजगी वाहने पोचू शकत नाहीत अशा दुर्गम भागात आपल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली आहे. तालुक्यात अनेक महाविद्यालये ,शाळा , सरकारी कर्मचारी आहेत इतर अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात , सामान्य माणसालाही आंदोलनाचा फटका बसत आहे.








Be First to Comment