Press "Enter" to skip to content

वाट चुकलेल्याला मिळाले कुटूंब

शिहूतील तरुणांनी घडविले माणुसकीचे दर्शन : वाट चुकलेल्या वक्तीला केले कुटुंबाच्या ताब्यात

सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | प्रतिनिधी |

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आताची तरुणाई इंटरनेट आणि मोबाईल मध्ये पूर्णता गुरफटली आहे पण त्यातूनच काही तरुण सामाजिक बांधिलकी जपत आहेत. असे म्हंटले जाते देशाचे उज्वल भविष्य ही युवपिढी आहे आणि त्याचंच एक ज्यवलंत उदाहरणं म्हणेज शिहू येथील तरुण !

काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान एक व्यक्ती रस्त्याने चालत अलिबाग- पोयनाड च्या दिसेन जात असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास येताच शिहू येथील परमार्थ ग्रुप चे शुभंम मोकल यांच्या कडे संपर्क साधला, शुभंम मोकल यांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे नाव राजेश दांडेकर असल्याचे आणि ते रोहा- अष्टमी येथून चालत आल्याचे समजले. व्हाट्सअप द्वारे त्यांच्या नातेवाईकांना सोबत संपर्क करून त्यांची माहिती दिली. थोडया वेळाने त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी शिहू येथे पोचले. आपला भाऊ सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी सर्व तरुणांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.