Press "Enter" to skip to content

बेणसे ग्रामपंचायतीत विकासकामे

बेणसे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामे व शिवसेना संपर्क कार्यालयाचे आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन 

महाविकास आघाडी असो की एकाकी लढत आगामी जि. प निवडणुकीत शिवतीर्थावर  शिवसेनेचा भगवा फडकवल्या शिवाय शांत बसणार नाही: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी यांची गर्जना 

आंतरराष्ट्रीय खेळाडू व देशसेवा करणाऱ्या व्यक्तींचा केला  विशेष सन्मान 

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

महाविकास आघाडी समवेत असो की एकाकी लढत आगामी जि. प निवडणुकीत शिवतीर्थावर  शिवसेनेचा भगवा फडकवल्या शिवाय शांत बसणार नाही अशी गर्जना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी यांनी बेणसे येथील सभेत  केली.  शिवसैनिकांनी कामाला लागा, व आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने वागा असा सल्ला यावेळी दिला. सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते उद्धव कुथे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटना वाढीबरोबरच विकास कामांचा धुमधडाका सुरू केला आहे. 

बेणसे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामे तसेच बेणसे वाडी व्यायाम शाळा नूतनीकरण आणि उद्धव दशरथ कुथे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेंद्र दळवी यांनी उपस्थित शिवसैनिकात प्रचंड जोश व उत्साह निर्माण करणारे धडाकेबाज भाषण केले.आ. दळवी पुढे म्हणाले यापूर्वी 

शेकाप व राष्ट्रवादीत काम केलं आहे, त्यामुळं त्यांची  राजकीय कार्यपद्धती मला ज्ञात आहे.मुळातच  माझा जन्म शिवसेनेत झालाय, त्यामुळे कुठेही भरकटलो तरी सेनेतच येणार, असे दळवी यांनी ठासून सांगितले. निवडणुकांची रणधुमाळी सुरू होतेय, शिवसैनिकांनी आपापसातील गट तट , मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना वाढ व मणबुतीवर भर द्यावा, इगो बाजूला ठेवा, पक्षात नव्याने दाखल झालेल्याना सन्मान द्या, तळागाळातील माणसाशी सन्मानाने वागा असा मार्गदर्शक सल्ला आ.दळवी यांनी दिला. 

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व देशसेवा करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान  करण्यात आला. यावेळी उद्धव कुथे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य  करण्यासाठी अहोरात्र झटणार असल्याचे सांगितले. तसेच शिहू बेणसे रस्ता दर्जेदार व डांबरी करणयुक्त व्हावा व बेणसे आंबा नदी खाडीवर असलेला प्रस्तावित पूलाला लवकरात लवकर कृतिशील मान्यता मिळावी अशी मागणी केली, या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार असल्याची ग्वाही आमदार दळवी यांनी दिली.

यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख तथा जि. प सदस्य किशोरशेठ जैन , कामगार नेते दीपक भाई रनावडे, कामगार नेते साधुराम मालुसरे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र गावंड, माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, कामगार नेते अरुण कुथे,  अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, युवा नेते सुधीर ढाणे,युवा तालुका अधिकारी राजेंद्र वाळंज,  लक्ष्मण खाडे, सरपंच मधुकर पारधी, उपविभाग प्रमुख अशोक भोय, माजी रायगड जिल्हा संघटिका सौ.कल्पना पाटील, पेण तालुका संघटिका दर्शना जवके, शिहू विभाग संघटिका सौ.सरिता पाटील, उपविभाग संघटिका सुषमा वारगे,माजी सरपंच प्रीती ताई कुथे, आदीसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.