सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील रोठ खु.येथे संपन्न झालेल्या दीपाळी सणाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या गड- किल्ले स्पर्धेस बच्चे कंपनीचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
पर्यावरण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येथील बच्चे कंपनीच्या कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या गड-किल्ले स्पर्धेत रोठ खु.येथील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.तर या स्पर्धेत सुयश संपादित केलेल्या स्पर्धकांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर मोरे,हरिश्चंद्र मोरे,लक्ष्मण मोरे, राकेश मोरे,सचिन मोरे,अप्पा मोरे,प्रकाश डाके,स्वामी मोरे,ओमकार मोरे आदी मान्यवर मौडळींकडून सन्मानचिन्ह व अन्य बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
तर गड-किल्ल्यांची माहिती होऊन आपला ऐतिहासिक वारसा जपला जावा या उद्देशाने सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.








Be First to Comment