Press "Enter" to skip to content

तुर्भे पंचक्रोशीतील विकासकामे

पोलादपूर तालुक्यात विकासकामे करून जनाधार मिळतो ; आगामी

काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीचे धोरण – आ.अनिकेत तटकरे

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमध्ये येत्या काही महिन्यांत विकासकामांची पूर्तता झाल्यानंतर ग्रामस्थांना प्रत्यक्ष विकासकामांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. पोलादपूर तालुक्यात विकासकामे करूनच जनाधार मिळतो. तालुक्यातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल निर्माण होईल तसेच येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीस पोलादपूर तालुक्यातून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक रस्त्याचे उदघाटन, तुर्भे खुर्द रस्त्याचे उदघाटन, बांद्रेवाडी रस्त्याचे उदघाटन, वझरवाडीतील संरक्षण भिंत आणि तुर्भे कुंभारवाडी सभामंडपाचे भूमिपुजन असा विकासकामांचा झंझावात आ.अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सुरू झाला. याप्रसंगी वझरवाडीतील विठ्ठल रूक्मीणी मंदिरामध्ये शेवटी सभेत रूपांतर झाले असता आ.अनिकेत तटकरे बोलत होते. याप्रसंगी सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वाय.सी.जाधव, तालुका सरचिटणीस सुहास मोरे, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, कृष्णा करंजे, मधुकर उतेकर, सुदास मोरे, बारकू शिंदे, नितीन आरडे, बाळकृष्ण चव्हाण,महमद मुजावर, भाई पाटेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

आ.अनिकेत तटकरे यांनी पुढे, कोरोना जागतिक महामारीच्या काळात आमदार निधी गोठविले जात असताना आपण निधी देऊ शकलो याचा आनंद असून तरूणांना रोजगार आणि नळपाणी योजना कशा कार्यान्वित यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. खासदार तटकरे आणि पालकमंत्री ना.अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची येथील जनतेला अपेक्षा आहे, या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व्यापक जनाधार मिळणार याची खात्री असल्याचे यावेळी आ.अनिकेत तटकरे सांगितले.

यावेळी वाय.सी.जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये, दिवील ते सवाद रस्ता, तुर्भे न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन खोल्यांच्या उभारणीसाठी निधी, पोलादपूर तालुक्यातील तरूणांना रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसीच्या उभारणीची मागणी करताना अन्य पक्षाचे नेते आपल्या कामांचे श्रेय घेत असल्याची टीकाही केली.

तुर्भे पंचक्रोशीमध्ये आ.अनिकेत तटकरे यांचे ठिकठिकाणी उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी तुर्भे पंचक्रोशीतील विविध समस्यांसह महिला बचत गटांसंदर्भातील प्रोत्साहनासंदर्भात आ.तटकरे यांना निवेदने देण्यात आली. याप्रसंगी सहदेव उतेकर, मधुकर उतेकर, सुदास मोरे, गोविंद उतेकर, मंगेश उतेकर, कृष्णा उतेकर, नामदेव उतेकर तसेच अन्य ग्रामस्थ यावेळी तुर्भे पंचक्रोशीतील आ.अनिकेत तटकरे यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.