Press "Enter" to skip to content

शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश

पोलादपूर-तुर्भे बुद्रुक येथे शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश

…तर आरे ला कारे उत्तर मिळेल – आ.भरत गोगावले

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तुर्भे पंचक्रोशीतील जनतेने विकास कामासंदर्भात चिंता अणि काळजी करू नये. विकास कामे सातत्याने केली म्हणूनच जनतेने तीन वेळा निवडून दिले आहे. विकास कामे तर होतीलच. पण याठिकाणी जर माझ्या शिवसैनिकांना कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ‘आरे ला कारे’ केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा आ.भरत गोगावले यांनी दिला.

पोलादपूर तालुक्यातील सर्वात राजकीयदृष्टया प्रवाही असलेल्या तुर्भे पंचक्रोशीतील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासोबतच आ.भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर दृढविश्वास दर्शविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी शिवानी महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानाचा आमदार गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार, उपतालुकाप्रमुख शौकत तार्लेकर, विभाग प्रमुख अनिल भिलारे, लक्ष्मण मोरे, दशरथ उतेकर तसेच विभागातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक इत्यादी उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यानी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दिवाळीच्या मुहूर्तावर तुर्भे खुर्द येथे विविध कामांचे भूमिपूजन व उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी तुर्भे खुर्द येथील ग्रामस्थांनी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.