Press "Enter" to skip to content

किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

बच्चे कंपनी बनविलेल्या किल्यांना पारितोषिक देवून केले सन्मानित

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

दिवाळीच्या सुट्टीमध्ये बच्चे कंपनीने उत्तम अश्या किल्ले घडविल्यामुळे त्यांच्या मधिल असलेली कलेला वाव मिळावा शिवाय किल्ले बनवून जणू लहान मुलांनी किल्ले संवर्धनाचा संदेश दिल्यामुळे त्यांच्या मध्ये असलेले गड किल्याबद्दल प्रेम आणी त्यांनी मेहनत घेवून घडविलेल्या किल्यांचे कौतुक व्हावे या या दृष्टीकोणातून गड किल्ले स्पर्धेचे आयोजन माजगांव – आंबिवली येथे करण्यात आले यावेळी किल्ल्यांचे परीक्षण करुन प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने बच्चे कंपनीना सन्मानित करण्यात आले.

शाळेला दिवाळी सुट्टी पडल्यावर बच्चे कंपनीनी किल्ले बनविण्यात व्यस्त झाले होते.आपल्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळावे शिवाय आपण बनविलेला किल्ला सुंदर आणी देखणा असावा या दृष्टीकोणातून किल्या बनवितांना त्या किल्यांची माहिती घेवून किल्ला साकारण्यात आला होता.

किल्याचीतटबंदी,विहिर,भुयारीमार्ग,धान्याचा आणी दारु गोळा कोठार, शेती अश्या सर्व या किल्यात समाविष्ट करण्यात आल्यांने त्यात किल्यांचे परिक्षण करुन रोख रक्कम सन्मान चिन्ह देण्यात आले.

दर वर्षी प्रमाणे किल्ले स्पर्धाचे आयोजन गुरुकृपा प्रतिष्ठान तर्फे माजगाव करण्यात आले होते यावेळी ३४ जणांनी सहभाग घेतला होता.

यावेळी किल्ले परिक्षक म्हणून वेधसह्याद्री प्रतिष्ठान चे प्रतिनीधी उपस्थित होते.या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वांना पारितोषिक त्यास समवेत रोख रक्कम,सोबत एक छोटं रोपटं भेट देण्यात आले.

यावेळी माजगांव प्रथम क्रमांक- राज जनार्दन काठावले(रायगड) द्वितीय क्रमांक- ऋषभ विलास कांबळे(सिंधूदुर्ग) तृतीय कांबळे- हर्ष जयवंत कांबळे(प्रतापगड) यावेळी मान्यवर म्हणून आकाश घरडे,राम देशमुख, राजेश गडद,ओमकार पाटील,आनंद जानकर व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.