चिंध्रण येथे ठाणे – रायगड परिसरातील शर्यत शौकीनांची सभा संपन्न
सिटी बेल | पनवेल |
बैलगाडा शर्यती वर असलेल्या बंदी विरोधात आता बैलगाडा मालक-चालक तसेच अड्डा चालक एकवटले असून त्यांची एक महासभा पनवेल तालुक्यातील चींध्रण येथे पार पडली.
भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या प्रयत्नातून अत्यंत कमी वेळेत या सभेचे आयोजन करण्यात आले होते तरी देखील या सभेला उत्तम प्रतिसाद लाभला. शासनाने बैलगाडा चालक-मालक यांची भावना समजून घेऊन शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी पंढरीनाथशेठ फडके – अध्यक्ष : बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, संदीपशेठ माळी – उपाध्यक्ष : बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, एकनाथशेठ देशेकर – अध्यक्ष : भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल मोर्चा रायगड जिल्हा , नामदेवशेठ जमदाडे चिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका,आत्माराम पाटील चिंध्रण,
चेतन शेठ आपटे कुळगाव बदलापुर,
राहुल भाई पाटील आडिवली कल्याण,
अविनाश शेठ पवार चिकलोली अंबरनाथ,
बंडु शेठ म्हात्रे बागशाला डोंबिवली,
किशोर शेठ अनंता पाटील बोनिवली अंबरनाथ, दिपक शेठ पाटील चिरले उरण,
महेश शेठ पाटिल ताडाळी भिवंडी,
संतोष शेठ भंडारी हेडुटने डोंबिवली,
समिर शेठ भोईर मोठागाव डोंबिवली,
विष्णूशेठ पाटील देसाई डोंबिवली,
महेश शेठ म्हात्रे ओवले पनवेल,
पुप्पू शेठ पाटील मांगरुल अंबरनाथ,
आकाश शेठ राऊत कात्रप बदलापुर,
पंडित शेठ म्हात्रे गोळिवली कल्याण, ज्ञानेश्वर शेठ ठाकुर जासई उरण,
विजय शेठ खानावकर नावडे पनवेल आदी उपस्थित होते.

















Be First to Comment