सिटी बेल दिवाळी अंकावर मान्यवरांचा स्तुतिसुमनांचा वर्षाव
सिटी बेल | पनवेल |
सिटी बेल या इंग्रजी साप्ताहिकाचा सन २०२१ चा दिवाळी विशेषांक प्रकाशित झाला. या दिवाळी विशेषांकाचा विषय एक्सप्लोर द वर्ड असा घेण्यात आला होता. जगातील तसेच भारतातील अशी काही पर्यटनाची ठिकाणे जी अतिशय सुंदर आहेत परंतु अनेकांना ते माहीत नाहीत. अशा पर्यटनस्थळांची माहिती या अंकाद्वारे वाचकांना देण्यात आली आहे.
सिटी बेल च्या या दर्जेदार विशेषांकाचे मुख्य प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी देखील अंकाचे प्रकाशन करून अंकाची स्तुती केली.
सिटी बेल च्या अंकाचा प्रिंटिंग चा दर्जा, वापरलेला कागद, यातील लेख, उत्कृष्ट सजावट आणि मांडणी या सर्वांचे मान्यवरांनी तोंड भरुन कौतुक केले.

















Be First to Comment