रोहा येथील रांगोळी स्पर्धेत नागोठण्यातील युवतींचे यश
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून रोहा येथे दिपावली निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य दिव्य रांगोळी स्पर्धेत नागोठणे के.एम.जी. विभागातील युवती कु. प्रणाली दत्ताराम राजिवले व कु सुचिता भगवान चाचले यांनी सहभागी होऊन चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस मिळवित यश संपादन केले आहे.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री कु. अदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी नागोठण्यातील या दोन्ही तरुणींना रोख रक्कम रु. १००१, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.

कु. प्रणाली राजिवले व कु. सुचिता चाचले यांनी या स्पर्धेमधे भाग घेउन संस्कार भारती या नावाने असलेल्या रांगोळी प्रकारात अतिशय उत्तम प्रकारे रांगोळी त्यांच्याकडून काढण्यात आली आणि या रांगोळीला चतुर्थ क्रमांक मिळण्यात त्यांना यश आले. या दोन्ही युवतींचे के एम जी विभाग व नागोठणे शहराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून यापुढेही त्यांनी अशा विविध स्पर्धेत भाग घ्यावा आणि आपल्या गावाचे नाव रोशन करावे यासाठी त्यांना सर्वत्र शुभेच्छा देण्यात येत आहेत.








Be First to Comment