Press "Enter" to skip to content

एसटी कर्मचाऱ्यांत फुट

कर्मचार्‍यांचा विरोध न जुमानता त्या बस चालक व महीला वाहकाने आणली बस

संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मोडणाऱ्या चालकाला घातल्या बांगड्या तर महीला वाहकाला घातला हार : अपमास्पद वागणुकीने अश्रू अनावर

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

एसएसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. अशातच परळवरुन प्रवाशांना आणणार्‍या बस चालक काशिनाथ गायकवाड व कंडक्टर रेणूका थोरात यांचा अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी निषेध केला. कर्मचार्‍यांचा विरोध न जुमानता त्या बस चालक व वाहकाने बस आणल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

एसटी कर्मचारी संघटनेने संप पुकारलेला असतानाही सहभागी न होता परळ-अलिबाग एसटी बस घेऊन आलेल्या एसटी चालकाच्या हातात अलिबाग आगारातील संपात सहभागी असलेली कर्मचार्‍यांनी बांगड्या भरत हार घालून निषेध केला. पेणमध्ये देखील सदर चालकाला कर्मचारी संघटनेने एसटी बस पुढे न नेता पेण मध्येच उभी करण्यास सांगितले होते. मात्र कोणाचेच न ऐकता त्याने अलिबाग येथे बस आणल्याने सर्व कर्मचारी संतप्त झाले होते.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.