एस.टी.कर्मचारी संपास ८६००० वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांचा जाहीर पाठिंबा
सिटी बेल | मुंबई |
महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीचा सार्वजनिक उद्योग म्हणून ओळखला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून गाव तिथे एस.टी ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातील जनतेला सेवा करत आहे.या उद्योगात काम करणारे सर्व कर्मचारी व अधिकारी हे जिवाचं रान करून अविरतपणे सामान्य माणसाच्या सेवेचे व्रत घेऊन काम करत आहे.
या उद्योगाला काही राजकीय मंडळीची नजर लागली व भ्रष्टाचाराच्या विळख्यात गेल्यामुळे शेकडो कोटी रुपयाचे नुसकान झालेले आहे. खाजगी प्रवासी सेवेला मदत करून सरकारने सुद्धा एस.टी.ला कमजोर करण्याचे काम केले आहे.ही वास्तविकता कोणी नाकारू शकत नाही.एस.टी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या रास्त मागणी करता एस.टी.च्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन नाईलाजाने सरकारने मागणी मान्य न केल्यामुळे दिवाळीमध्ये संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
दि.२७ ऑक्टोंबर २०२१ पासून एस.टी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन करून राज्यव्यापी उपोषण सुरू केले.उपोषण सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने वेतनवाढ,महागाई भत्ता व घरभाडे भत्ता या मागण्या मान्य केल्या.मात्र एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हि मुख्य मागणी मान्य न केल्यामुळे दि.२८ ऑक्टोबर पासून बेमुदत संप सुरू केला आहे.न्यायालयाने संप बेकायदेशीर घोषित केल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता संप पुढे चालवत एकजुटीची मशाल कायम ठेवली.
विज उधोगातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्या कार्यरत प्रथम व मोठी कामगार संघटना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन(संलग्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) ने राज्य परिवहन महामंडळातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या संपास जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,असून सरकारने तात्काळ संपावर तोडगा काढावा व सपंकरी संघटनाच्या मागण्या मान्य करावे असे आव्हान मा.मुख्यमंत्री व मा.परिवहन मंत्री यांना केलेले आहे.

















Be First to Comment