Press "Enter" to skip to content

वनवासी वाड्यावर फराळ वाटप

रायगड जिल्ह्यात 283 वनवासी वाड्या मधील 17 हजार कुटुंबांना फराळ वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

रायगड जिल्ह्यात एकूण 283 वनवासी वाड्या मधील 17 हजार कुटुंबांना फराळ वाटप करताना 350 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. एकत्वाचा – समरसतेचा भाव जोपासून कर्जत प्रखंडात एकूण 39 वनवासी वाड्यातून 2 हजार 100 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.

विहिंप कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, प्रखंड धर्मप्रसार प्रमुख अनंता हजारे,
कुलाबा जिल्हा बजरंग दल सह संयोजक रमेश नाईक, अ‍ॅड.अविनाश बैलमारे, अ‍ॅड.दीपक डवरी, धर्मजागरण कार्यकर्ते दशरथ वाघमारे, वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ते ईश्वर चौधरी, दीपक दळवी, सिद्धी दळवी, सीता वाघमारे, बाळू पवार, वसंत महाडिक यांनी सहभाग घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.