पोलादपूर शहरात लोकविकास तर्फे दिवाळी पहाट : ‘लकी ड्रॉ’ सोबत फनी गेम्स आणि सुश्राव्य गायन
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
शहरामध्ये दिवाळी पहाटचा आगळावेगळा आटोपशीर कार्यक्रम ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानी जवळील हॉटेल कोकण स्वादच्या मोकळया जागेत लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला असता यावेळी ‘लकी ड्रॉ’सोबत फनी गेम्स आणि सुश्राव्य गायनाची मेजवानी उपस्थितांना लाभली.
पोलादपूर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप भागवत यांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी स्व.माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या विचारांचा वसा आम्ही पुढे चालविणार असल्याचे राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक उपक्रमदेखील राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला आयोजक सुवर्णा सुभाष भुवड, श्रावणी शहा, शुभांगी चव्हाण, ऍड.सायरा धामणकर तसेच आयोजक स्वप्नील भुवड, अरुण मोहिते, सचिन दुदुस्कर, नासीर धामणकर, संजय मोहिते आदींना कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. याप्रसंगी दर्पण दरेकर, मंगेश नगरकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, संतोष चव्हाण, माजी सरपंच अमोल भुवड, डॉ.नितीन मपारा आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.

याप्रसंगी विविध प्रकारच्या फनी गेम्स मध्ये सर्वात जास्त बांगडया घातलेल्या महिला म्हणून प्रियांका निखिल कापडेकर, सर्वात उंच सॅण्डल घातलेली महिला शीतल अभिजित मेहता, सर्वात मोठं कुंकू अथवा टिकली लावलेली महिला अल्का बाळू पवार, सर्वात कमी केस असलेली महिला म्हणून आरोही अरुण मोहीते तर सर्वात लांब केस असलेली महिला म्हणून श्रावणी येरुणकर तसेच वजनदार पुरूष म्हणून लहू पवार आदींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध वस्तुच्या लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल लावण्यात आला असता सोन्याची अंगठी या सर्वात मोठया बक्षिसाचा मानकरी अर्णव विनायक दिक्षित हा ठरला तसेच इतर अनेक बक्षिसांचे वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराओके म्युझिक सिस्टीमसोबत गायक अमोल परब आणि गायिका मनाली रानडे यांनी सुस्वर गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय येरूणकर आणि हाटेसर यांनी अतिशय उत्कंठावर्धक केले.








Be First to Comment