Press "Enter" to skip to content

पोलीसांना फराळ

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

महाराष्ट्र पोलीस यंत्रणेच्या कार्यासाठी व मागील दोन वर्षातील कोव्हीड- 19 मुळे असणारा ताण व कामाचा अधिक व्याप यशस्वी पणे हाताळून केलेल्या कार्यासाठी विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फराळ देऊन शुभेच्छा दिल्या कृतज्ञता व्यक्त केली.

कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, प्रशांत देशमुख व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी विहिंप कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, प्रखंड धर्मप्रसार प्रमुख अनंता हजारे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.