Press "Enter" to skip to content

शिवसैनिक राष्ट्रवादीत

कळंब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का : शिवसैनिकांचा राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

शिवसेनेच्या स्थापनेपासून कळंब ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना शाखेची स्थापना केली असे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, तसेच त्यांचे सहकारी अन्वर बुबेरे यांचे चिरंजीव रईस बुबेरे, सचिन चोनकर, शिवसेनेचे पंधरा वर्षे शाखाप्रमुख असलेले जनार्दन बदे, सागर बदे, ज्ञानेश्वर बदे, रोजप लोगडे, अविनाश भोईर, नवीन परदेशी, प्रभू धुळे, मोहन पारधी, रवींद्र बनसोडे, प्रभाकर बनसोडे, आदी कट्टर शिवसैनिकांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्षा अ‍ॅड.रंजना धुळे, गटनेते शरद लाड, माजी सरपंच फाईक खान, विद्यमान उपसरपंच राहुल परदेशी, शाहनावाज पानसरे, अरुण बदे, जितू काळण, शोहेब पानसरे, शाहिद मस्ते, महेश कोंडीलकर, वसंत बदे, साहिर लोगडे, विठ्ठल बदे, सागर बदे, विनोद मोरे, कैलास बनसोडे, सुमित बनसोडे, महिंद्र बनसोडे, हर्षद मस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.