पंचशिल ग्रूप माजगांव,येथे चिमुकल्यांनी बनवली सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
दिवाळी या सणामध्ये किल्ले बनविण्यांची जणू बच्चे कंपणी ची स्पर्धाच ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.एकापेक्षा सरस असे किल्ले प्रत्येकांच्या घरी पहावयास मिळत असून जणू ही लहान मुले आपल्या महाराष्ट्रत असलेले किल्ले जतन करण्यांचा संदेश पंचशिल ग्रूप माजगांव या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला क्षणी तयार झालेले किल्ले पहाताच क्षणी आपण या किल्यांच्या जवळ असल्यांचा भास निर्माण होत आहे.
काही मुले किल्ल्यांची हुबेहुब प्रतीकृती बनवित असल्यामुळे हे पाहणे प्रेक्षणीय ठरत आहे.त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.किल्यांवर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, सैन्य, तोफ, वाघ, हती, हरीण असे विविध प्राणी , अश्या माध्यमातून किल्ले तयार करून अनेकांना भुरळ घातली जात आहे.किल्ला बनविताना विशिष्ट पद्धतीचा वापर करून तयार केला जात आहे.तोफ कुठे ठेवायची भुयारी मार्ग नगार खाना,पाण्यांचे हौद,तलाव,विहीर,गुरांचा गोठा,मंदिर,मावळ्यांची राहण्यांचा निवारा जणू या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
शिवाय किल्यांची तटबंदी साठी चुनखडी चा वापर करुन रंगविले जात.असे किल्ले सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे मनात एकच विचार रेंगाळत असतो की ? माझा किल्ला हा प्रत्येकाला पाहात क्षणी आवड निर्माण व्हावी? शिवाय या माध्यमातून किल्ले जोपासण्यांचा आणी त्यांचे संवर्धन व्हावे हा संदेश आताच्या तरुण वर्गामध्ये निर्माण व्हावे.या उद्देशाने किल्ले बनविण्यात येत असल्यांचे प्रेम कांबळे,सुशांत जाधव,दक्ष गायकवाड, लक्ष कांबळे,आर्यन कांबळे,राज भालेराव,रुषभ कांबळे या बच्चे कंपनीनी प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले.








Be First to Comment