Press "Enter" to skip to content

आदीवासी बांधवांना फराळ

कानसा वारणा फाउंडेशनच्या वतीने आदीवासी बांधवांना फराळाचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकदादा पाटील यांच्यावतीने कशेळे पोखरकरवाडी, मतेवाडी व आसपासच्या आदीवासी वाड्यातील कुटूंबाना फराळाचे वाटप करण्यात आले.आदिवासी बाधवांची दिवाळी आनंदात जाओ व लहान मुलांना फटाक्यांचा आनंद लूटता यावा यासाठी दिपकदादांनी आदीवासी बांधवांना दिपावली फराळाचे वाटप केले.

कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक दादा पाटील यांनी आदीवासी बांधवांसोबत दिपावली साजरी केली.याप्रसंगी आदीवासी बांधवांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.यावेळी दिलीप ताम्हाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.