Press "Enter" to skip to content

उंबरखिंडवर दीपोत्सव साजरा

सह्याद्री प्रतिष्ठानाकडून ऐतिहासिक उंबरखिंडवर दीपोत्सव साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

खालापूर तालुक्यातील समरभूमी उंबरखिंड श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई. ही लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्ध तंत्राचे उत्तम उदाहरण.याच लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक.
गडकिल्ले म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची खरी संपत्ती. आणि त्या संपत्तीचं संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून सह्याद्री प्रतिष्ठान खालापूर विभागाच्यावतीने शुक्रवार दि.५ रोजी दीपावली पाडवा निमित्ताने सकाळी ६.०० वाजता दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम विजयस्तंभ व परिसराची स्वच्छता करून स्मारक सभोवताली रांगोळी काढून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली, तसेच विजयस्तंभ चौथऱ्यावर पणत्या लावण्यात आल्या.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून दीपोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली.

यावेळी सह्याद्री दुर्गसेवकांनी उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाच्या समोरील बाजूस असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रसज्ज शिल्पला आकर्षक हार फुलांनी सजवून आरती करीत शिवगारद केली.या वेळेस उपस्थित दुर्गसेवकांच्या उत्साहाला उधाण आले होते,सारा आसमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय याने दुमदुमला तसेच पणत्यांनी परिसर उजळून निघाला.

या ऐतिहासिक कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रितेश तटकरे,समीर घोसाळकर, रमेश शिंदे, रोहिदास ठोंबरे ,संदीप जाधव, मंगेश जाधव, संदीप सावंत, समाधान गावंड, जयेश भालेकर,शरद मालकर, अमित पवार, साहिल शिंदे, प्रवीण धूमक, मुकुंद गोनबरे, सुबोध राऊत, तेजस करंजे, अक्षय हेलांडे, निखिल तांबडे, विवेक तांबडे, ओमकार तटकरे, ऋतिक दळवी, रोशन ठोंबरे हे दुर्गसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.