Press "Enter" to skip to content

अविश्वास ठराव बारगळला

किल्ला सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला : अखेर सत्याचाच विजय सरपंच योगेश बामुगडे यांची प्रतिक्रिया

सिटी बेल | रोहा | प्रतिनिधी |

रोहे तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या किल्ला ग्रा.पंचायतीमधील सरपंचावर विद्यमान सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव पुर्ण बहुमत सिद्ध न झाल्याने अखेर बारगळला.तर संपूर्ण ताकदीनिशी सरपंचाला खुर्चीवरून उतरविण्याच्या तयारीत असलेल्यांचे मनसुबे पुर्ण न झाल्याने त्यांच्या पदरी पुरती निराशा आली असल्याची याबाबत एकच चर्चा सर्वत्र रंगात आली आहे.

गत दोन वर्षापूर्वी किल्ला ग्रा.पं.निवडणुकीत थेट सरपंचपदाचे निवडणूकीत महाविकास आघाडीकडून योगेश बामुगडे निवडणूक रिंगणात होते.त्यांच्या विरोधात बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयवंत मुंढे पुर्ण ताकदीनिशी उतरले होते.राजकारणात नवखे असताना देखील अंगी लढवय्यी व भिडण्याची व्रुत्ती तर जोडीला ग्राम विकास आघाडीची असणारी भक्कम साथ या जोरावर योगेश बामुगडे थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत मुंढे यांचा पराभव करीत विजयी झाले.त्यानंतर पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले.केवल पदाच्या माध्यमातून विकासकामे होत नाहीत तर त्यासाठी भक्कम साथ असावी लागते. याकरिता पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन योगेश बामुगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यानंतर विद्यमान सरपंच पदाचा गैरवापर करुन मनमानी करतात हा आरोप ठेऊन सात सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला.मात्र पुर्ण बहुमत न झाल्याने अखेर योगेश बामुगडे यांचे सरपंचपद कामय राखले गेले आहे.योगेश बामुगडे यांच्या बाजूने दोन सदस्य ठामपणे राहिल्याने विरोधकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. या सर्व घडामोडीत माजी आ.अवधूत तटकरे यांचे खंदे समर्थक तथा माजी सरपंच चंद्रकांत बामुगडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात जाऊन सरपंचावर पायउतार होण्याची नामुष्की ओढावल्याने योगेश बामुगडे यांनी आता दुसऱ्या तटकरेंचे नेतृत्व स्विकारल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.