मुठवली स्मशानभूमी कामाकरिता आ.अनिकेत तटकरे यांच्र्याकडून ७ लाखाचा निधी
सिटी बेल | रोहे | शरद जाधव |
रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथील स्मशानभूमी कामाकरिता विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या निधीतून रू.७ लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
ग्रामीण विकास साधण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर असतो हे विविध उदाहरणातून समोर आले आहे. त्याच उद्देशाने मुठवली खु.येथील स्मशानभूमी विकासासाठी ग्रामस्थांनी विनंती अर्ज केल्यावर आ.अनिकेत तटकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ७ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याने रखडलेल्या स्मशानभूमीचे विकासकाम मार्गी लागल्याने आ.अनिकेत तटकरे यांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत.
येथील गावातील पिढ्यान पिढ्यांची स्मशानभूमी तशाच पद्धतीची होती. तालुक्यातील गावागावात स्मशानभूमींची विकासकामे पुर्ण झाली आहेत.मात्र या स्मशानभूमीला कोणीही वाली नव्हता. बदलते राजकारण व नेतृत्व यामुळे या ग्रा.पंचायतीला आ.अनिकेत तटकरे यांचे नेतृत्व लाभले.मालसई ग्रा.पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्यावर मुठवली ग्रामस्थांनी स्मशानभूमी विकासकामाची कैफियत आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे मांडली.तर आ.अनिकेत तटकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रू.७ लाखाच्या.निधीचे पत्र देऊन नेता कसा असावा हे आपल्या कर्तत्वातून दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया मुठवली ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
आमचा विभाग पेण मतदार संघात येत असल्याने आम्ही दुर्लक्षित राहिलो,मात्र आ.अनिकेत तटकरे यांच्यासारखे नेतृत्व आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आमच्या ग्रा.पंचायतीच्या विकासकामाच्या आशा पल्लवित झाल्या असून येथील विकासकामे ही अधिक व्यापकरित्या होतील असा विश्वास येथील ग्रामस्थांना वाटू लागला आहे.








Be First to Comment