Press "Enter" to skip to content

निराधार महिलांसोबत दिवाळी

निराधार महिलांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप : पंधरा वर्षांचा उपक्रम……

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत दहिवली मधील शासकीय कृपा महीला वसतीगृहातील पिडीत, निराधार महिलांना कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती चित्राताई तिटकारे यांच्या मदतीने दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली येथील शासकीय कृपा महिला वसतीगृहातील पिडित, निराधार महिलांना कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने फराळ वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, राहुल तिटकारे, वैशाली तिटकारे, सुरेश सावंत, सुधार गृहाच्या वरिष्ठ काळजी वाहक सुरेख जाधव, सुरक्षा रक्षक अनिता जाधव, जयश्री सकपाळ, जितेंद्र रुठे, माजी अध्यक्ष विजय मांडे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

वसतीगृहाच्या अनिता जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना हा फराळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही गेली पंधरा वर्ष करीत आहोत. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे आम्ही कार्यक्रम करू शकलो नाही. यापुढेही आम्ही आमची दिवाळी तुमच्या सोबतच साजरी करु.’ असा शब्द दिला. विजय मांडे यांनी, ‘ आपल्याला कोणतीही अडचण आली तरी हक्काने आम्हाला सांगा ती सोडविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. असे स्पष्ट केले. सुवर्णा पत्की यांनी आपल्या मनोगतात, ‘आपल्या सुख दुःखत आम्ही नेहमीच सोबत आहोत. कुणीही मनाला वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही मला अगदी बिनधास्तपणे सांगा. त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ असे सांगितले. ‘त्यानंतर वसतीगृहातील नूतन चव्हाण, कुनिरता स्वामी, नेहा पटेल यां निराधार महिलांनी गीते सादर केली. त्यानंतर वसतिगृहातील महिलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयुष रेणोसे या चिमुरड्यासह श्रावणी सावंत, इचिता व ईश्वरी तिटकारे या मुलींच्या हस्तेही फराळाचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.