नागोठण्यात शेकापला भगदाड :
शेकाप नागोठणे शहर चिटणीस राजेश पिंपळे यांचा सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व नागोठणे शहर चिटणीस राजेश पिंपळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी राजेश पिंपळे यांचे स्वागत करून राजेश पिंपळे यांनी धनत्रोदशी निमित्त आमच्या पदरात धन टाकले असल्याचे गौरवोद्गार यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी काढले. दरम्यान यावेळी नागोठणे मोहल्ल्यातील युवा कार्यकर्ते फय्याज पानसरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर सचिव रोहिदास हातनोलकर यांनी केले.
सुतारवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, हरीशशेठ काळे, कृष्णाजी धामणे, लियाकतशेठ कडवेकर, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, विभागीय अध्यक्ष तथा पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोषभाई कोळी, सुधाकर जवके, युवक जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, नागोठणे ग्रा. पं. सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, वांगणी ग्रा. पं. सदस्य प्रमोद जांबेकर, युवक शहर अध्यक्ष कुणाल तेरडे, रोशन पारंगे, ऍड. श्रीकांत रावकर, मनोज टके, चेतन टके, धृव सोष्टे, रोहिदास हातनोलकर , रविंद्र वाजे, प्रथमेश काळे, प्रमोद जांबेकर, किशन बोरकर, विक्रांत घासे, शाम पाटील, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, सुदर्शन कोटकर, संतोष चितळकर, मंदार चितळे, काझीम पानसरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार अनिकेतभाई तटकरे आपल्या मनोगतात म्हणाले की, या पक्ष प्रवाशाने नागोठण्यात दिवाळी आधीच ऍटमबॉम्ब फोडला असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी खांब आंबेवाडी मतदार संघास तोडीस तोड नागोठणे मतदार संघ झालेला आहे. राजेश पिंपळे यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळणार आहे. आता नागोठण्यातील ही तरुण कार्यकर्त्यांची फळी मागील जि. प व पं. स. निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्या शिवाय शांत बसणार नाही असा विश्वास यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त केला. खासदार सुनील तटकरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर यांच्या पक्ष प्रवेशाने नागोठणे विभागात चांगले वातावरण निर्माण होत आहे. विलास चौलकर यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर प्रत्येक आठवड्यात कोणता ना कोणता हाडाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. पूर्वी पासून मी नागोठणे विभागात विकासाचे काम करतच आहे. या पक्ष प्रवेशामुळे नागोठणे शहरात तरुणाईची मोठी ताकद निर्माण झालेली असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये समाजसेवा व पक्ष संघटनची मानसिकता तयार होत आहे. नागोठणे शहर व विभागातील राजकारण वेगळे आहे. कडसुरे पासून ऐनघर टोकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिद्दीने काम करा असा आदेश यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना खासदार सुनील तटकरे यांनी दिला. दरम्यान यावेळी राजेश पिंपळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.








Be First to Comment