Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये जनजागृती

कोव्हीड लसीकरण व मास्क विषयी जनजागृती

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत आमराई रिक्षा स्टँड येथे युनायटेड वे मुंबई यांच्या मार्फत कोविड लसीकरण व मास्क लावण्याचे फायदे काय होऊ शकतात याच्या वर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास युनायटेड वे मुंबई च्या रेखा जाधव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व लसीकरणाचे फायदे आणि काळजी कशी घ्यावी हे पटवून दिले.कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी आपल्या भाषणात सगळ्या चालकांनी काय उपाय योजना केल्या पाहिजेत व कशी आपली व आपल्या सोबत असणा-या प्रवाश्यांची काळजी घेतली पाहिजे हे पटवून दिले.

ह्या कार्यक्रमा साठी युनिटेड वे चे खंडू मंजुळे, अपेक्षा देशमुख, पोलीस हवालदार प्रशांत देशमुख, पोलीस शिपाई भरत पावरा व कर्जत आमराई स्टँड चे अध्यक्ष व सर्व चालक मालक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.