शिहू विभागात नागरिकांसाठी वीजग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु
सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | प्रतिनिधी |
शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना शाखाप्रमुख चोळे दिपक पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिहू हद्दीतील नागरिकांसाठी वीजग्राहक तक्रार निवारण कक्षाच शुभारंभ आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी पेण उप अभियंता सकपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उद्धघाटन प्रसंगी बोलताना शाखाप्रमुख दिपक पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या प्रमाणे हे समाजकार्य करत आहे. लाईट बिल विषयी तक्रारी साठी तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर पार करून नागरिकांना पेण ला जावं लागत होत त्यामुले मी आणि आमचं शिष्ठा मंडळ पेण ला जाऊन पेण उपभियंता सकपाळे साहेब यांची भेट घेऊन चर्चा करून तक्रार निवारण कक्ष चालू करण्याची विनंती केली. आणि ती मान्य करून आज तक्रार निवारण कक्षाचं शुभारंभ झालं आहे असे ते या वेळी आपले मनोगत वेक्त करताना म्हणाले.
या वेळी उपस्थित कामगार नेते लक्ष्मण खाडे, मा. सरपंच गणपत खाडे, देवराम कुथे, मनोज मोकल, केशव कुथे, हिरामण कोकाटे, पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके, शिहू विभाग संघटिका सरिता पाटील, बबन लेंडी, कृतेश खाडे, विजय पाटील, काशिनाथ भुरे, खंडू म्हात्रे, सुधीर पाटील, योगेश ठाकूर, नरेश खाडे, रणजित मोकल, राहुल ठाकूर, पुंडलिक म्हात्रे, नामदेव म्हात्रे, जनार्धन कुथे, इत्यादी नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment