Press "Enter" to skip to content

पोलादपूरात सभामंडपाचे उद्घाटन

मुंबईत आजही मराठी माणसासाठी शिवसेनेचा आधार : अभिनेते जयवंत वाडकर

कापडे भवानीवाडी सभामंडपाचे आ.गोगावले यांच्याहस्ते उदघाटन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

महाराष्ट्रातून मराठी माणसाला जेवढा शक्य तितका जास्त त्रास देण्याचा प्रयत्न अन्य भाषिकांकडून सुरू असताना आजही मुंबईमध्ये मराठी माणसासाठी शिवसेनेचाच आधार वाटत असल्याचे मत ज्येष्ठ मराठी सिनेअभिनेते जयवंत वाडकर यांनी येथे व्यक्त केले.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक भवानीवाडी येथील सभामंडपाचे उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण मोरे, माजी तालुकाप्रमुख अंकुश सकपाळ, शांताराम गोळे, तानाजी निकम, अनिल मालुसरे, सरपंच सुवर्णा सकपाळ, उपसरपंच रूपेश सकपाळ, जमिनमालक नामदेव सकपाळ आणि विठ्ठल सकपाळ, नारायण साने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी सिनेअभिनेते जयवंत वाडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी सभामंडपाच्या उदघाटनप्रसंगी आ.भरत गोगावले यांनी, भवानीवाडीची गेल्या अनेक वर्षांची गरज होती तो सभामंडप आज साकारलेला आहे. शिवसेनेने दिलेला शब्द पूर्ण करण्याची भुमिका कदापि बदलली नसून शिवसेनाच दिलेले शब्द पूर्ण करू शकते, याची खात्री बाळगावी असे यावेळी सांगितले. कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रत्येक वाडीमध्ये विकासकामांचा झंझावात पोहोचण्यासाठी येथील शिवसैनिकांनी सुचविलेल्या कामांची पूर्तता करण्याचे धोरण असून तिसऱ्या वेळी आमदार झाल्याने आपणावर संपूर्ण मतदार संघातील मतदारांच्या अपेक्षांना खरे उतरण्यासाठी अनेक विकासकामे करायची आहेत, असे यावेळी सांगितले.

याप्रसंगी आ.गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे आणि अन्य वक्तयांनी यावेळी समयोचित विचार मांडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.