Press "Enter" to skip to content

कामोठ्यात भाजपाचा अभिनव उपक्रम

बाजारापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळ बनविण्याचे जिन्नस केले उपलब्ध

सिटी बेल | कामोठे |

दिवाळी सणानिमित्त कामोठे येथील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने भाजपाकडून बाजारभावात पेक्षा स्वस्त किमतीत दिवाळीचा फराळ बनवण्याचे साहित्य विक्रीकरता ठेवण्यात आले आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेरच हा स्टॉल उभारण्यात आला आहे या संधीचा कामोठे येथील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आज या उपक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, नगरसेवक विकास घरत, कामोठे मंडळ सरचिटणीस शरद जगताप, भाजपा भटके-विमुक्त आघाडी उत्तर जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई तामखडे, कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कामोठे शहर सचिव मनीषा वणवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.