कर्जत मध्ये लाभार्थ्यांना मोफत ई श्रम लेबर कार्ड चे वाटप
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनिल गोगटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिक आणि श्रमिक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले त्यानंतर त्यांच्याच अनेक महत्वाकांक्षी योजनां पैकी एक ई श्रम लेबर कार्ड योजनेच्या भाजपच्या माध्यमातून केलेल्या लाभार्थ्यांना मोफत ई श्रम लेबर कार्ड चे वाटप करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, तालुका सरचिटणीस संजय कराळे, रविंद्र खराडे, कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे,तालुका सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, कर्जत शहर युवा अध्यक्ष मयूर शितोळे, शहर उपाध्यक्ष समीर घरलुटे, प्रज्ञा प्रकोष्ट संयोजक समीर सोहनी, सर्वेश गोगटे, मिनेश मसणे, राहुल मसणे, राहुल कुलकर्णी, सुप्रिया भगत, गीतांजली देशमुख, मारुती जगताप, विजय जिनगिरे, वसंत महाडिक सूर्यकांत गुप्ता, अभिषेक तिवारी, विजय कुलकर्णी, गणेश गवई , मंगेश फुलावरे, दुर्गेश करपे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment