Press "Enter" to skip to content

खालापूर खोपोली मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जंगी स्वागत

शासनाने आरक्षणाची जबाबदारी पार पाडावी अन्यता लॉंग मार्च शिवाय पर्याय नाही – खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

सर्वत्र ठिकाणी मराठा अरक्षणासदर्भात समाज बांधवांनी रान उठवले आणि जवळपास ५८ मुख मोर्चे काढले मात्र उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर लगेच सर्व सनमवयकाना एकत्र करीत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाची क्रांती उठविण्यासाठी छत्रपती शिवाजी माहराजांचे 13 वंशवज संभाजी राजे भोसले यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा सुरू केली आणि रायगड जिल्ह्यातुन या संवाद यात्रेला सुरुवात केल्यानंतर प्रथम खालापुरात वावोशी व खोपोली शहर यांच्यावतीने स्वागताचे सभा वावोशी येथे आयोजित केली होती यावेळी आपले विचार व्यक्त करताना खासदार संभाजी राजे भोसले यांनी अजून वेळ गेली नाही नाहीतर लॉंगमार्च चा निर्णय घेतला जाईल असा केंद्र व राज्य शासनाला इशारा दिला आहे

संपूर्ण महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरून आरक्षण मागत असताना जवळपास 58 मुख मोर्चे काढले परंतु शासनाला जाग आली नाही असे सांगत 9 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने याचिकेवर आक्षेप घेत आरक्षण नाकारल्याने तेव्हा पासून पुन्हा महाराष्ट्रात समजबाधवांच्या भेटीला दौरा सुरू करून यातूनच शासनाला पुन्हा जागे करण्यासाठी रायगड च्या भूमीतून सुरुवात करीत खालापूर व खोपोली शहराला भेट दिली यावेळी जोरदार स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी करीत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत शासनाला लवकर जागे व्हा असा इशाराच या यात्रेमधून समाज बांधव देत होते.

वावोशी येथे झालेल्या सभेसाठी रायगड मराठा आरक्षण समिती समन्वयक विनोद साबळे ,वैभव वाभले माजी नगराध्यक्ष सुनील पाटील राजीप सदस्य नरेश पाटील ,विजय पाटील ,आर एस पाटील , शंकर माणकवले,सुरेश पाटील, करण गायकर, अंकुश कदम, राजेंद्र कोंदे ,राजेंद्र गावडे , किशोर पाटील ,भूषण पाटील, शेखर पिंगले खालापूर तालुका सनमवयक शशिकांत मोरे , अशोक मराजगे, महेश पाटील यासह अन्य मान्यवर होते.

यावेळी पालिफाटा येथे राष्ट्रवादी चे युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्जत खालापुर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे त्यांनतर शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले याठिकाणी ही जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर खोपोली शहरातून मुख्य बाजारपेठ तुन ताफा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत दर्शन घेतले यावेळी उपनगराक्षा विनिता औटी कांबळे गटनेते सुनील पाटील ,मंगेश दळवी,नगरसेविका वैशाली जाधव प्रमिला सुर्वे ,माधवी रिठे, माजी उपनगराध्य रमेश जाधव,संतोष मालकर, शेकाप चे अविनाश तावडे , मधुकर दळवी , निलेश औटी,जयवंत पाटील भाजपाचे ईदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे, शोभा काटे ,दिलीप पवार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

या संवाद यात्रेच्या निमित्ताने समाज बांधवाशी संवाद साधताना खासदार संभाजी राजे भोसले म्हणाले सुप्रीम कोर्टाने आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिल्यानंतर पुन्हा या लढ्याला सुरुवात कारवी यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करून ही यात्रा रायगड च्या पवित्र भूमीतून सुरू केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला या आधी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होते त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.

आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केलं तेच आता हे राज्य शासन करीत आहे एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे पण मी भाजपाच्या कोट्यातून झालेला खासदार आहे म्हणून माझ्यावर भाजपाचा लेबल लावला आहे पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून खासदार आहे मी भाजपाचा असतो तर मला हाऊस मध्ये अरक्षणा संदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती पण मला बोलू दिले नाही तेव्हा शिवसेना ,राष्ट्रवादी व आय काँग्रेस पक्षाने मदत केली.

काय आम्ही मागतोय वसतिगृह अन्नसाहेब पाटील यांच्या महामंडल 1 हजार कोटी द्या त्या ठिकाणी विद्यार्थाना शिकण्याची संधी मिळेल दसरे आरक्षण मध्ये बलिदान दिले त्यांच्या नातेवाईकाला नोकरी द्या,त्याच बरोबर विद्यार्थावर अन्याय करू नका , सारथी शिक्षण संस्थेला मदत करा या सारख्या छोट्या मागण्या आहेत तरीही यावर विचार होत नसल्याने आम्हाला ही संवाद यात्रा काढावी लागली. संवाद यात्रेच्या दरम्यान सुरुवातीला कोरोना होता आता मोठमोठ्या सभा सुरू आहेत त्यामुळे आता गप्प नाही माझ सांगणं आहे अजून ही वेळ सरकारच्या हातातून गेली नाही जबाबदारी पाडा अन्यथा लॉग मार्च शिवाय पर्याय नाही असा इशारा यावेळी संभाजी राजे भोसले यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.