राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश घरत यांचा नारायण राणेंच्या उपस्थीतीत भाजपामध्ये प्रवेश
सिटी बेल | मुंबई | अमूलकुमार जैन |
सद्यस्थितीत भारत देशासहित जगात भारतीय जनता पक्ष हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती मूळे ओळखला जाऊ लागला असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार तथा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या भाजप पक्षप्रवेश वेळी केले.सदर पक्षप्रवेश हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्षप्रवेश कार्यालयात झाला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,भारतीय जनता पक्षाची स्थापना ही 1980 साली झाली .त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी,लालकृष्ण अडवाणी सारखे दिग्जज नेत्यांनी काही सहकारी यांच्या माध्यमातून देश सेवा करीत सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा या उद्देशाने स्थापना करण्यात आली.भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त करणे हा उद्देश होता.गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशात विकासाची गंगा आणली आहे.

त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना आणल्या आहेत.त्याच प्रमाणे महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचा कायापालट करण्यावर भर दिला. भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांच्या कार्यप्रणालीवर खुष होत अलिबाग तालुक्यातील कार्यकर्ते यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.भाजप मध्ये येणाऱ्यांची संख्या पाहता विरोधाक हे हतबल झाले आहेत. पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल. इतर पक्षासारखे नवीन जुना भेदभाव पक्षात केला जात नाही.सर्वांना समान वागणूक दिली जावे असे पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी सांगितले की,रायगडमधील युवा कार्यकर्ते यांना इतर पेक्षा भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत.एक दिवस असा येईल की रायगड जिल्हा हा पूर्णपणे भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. असाही विश्वास यावेळी व्यक्त केला.

प्रवेश कारणाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी तीन दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरचा दंडवत करीत भाजपचा कमळ हाती घेतला आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापरा, अलिबाग तालुका सरचिटणीस संतोष पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment