विना परवानगी शूटिंग करणाऱ्यावर कर्जत मध्ये गुन्हा दाखल
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपित रा.पनवेल याने श्री.कृपा प्रॉडक्शनच्या वतीने पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय आंबिवली बौध्द लेणी येथे श्री.राधा कृष्ण मंदिर असल्याचा सिन निर्माण करुन विनापरवानगी शुटिंग केली.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.273/2021 पुरातन वस्तू आणि कला जतन अधिनियम, 1972, प्राचीन स्मारके व पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम 1958 चे सुधारित 2010 चे कलम 30 (1) नुसार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करीत आहेत.








Be First to Comment