Press "Enter" to skip to content

पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण हा संदेश देत कर्जत मध्ये जनजागृती करण्यात आली.

नगरपरिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचा प्रतिसाद आणि सहभागाने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्यावतीने आज दि.24 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपरिषद कार्यालयाच्या प्रागणांतून सकाळी 9 वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, बांधकाम विभागाचे लेखनिक रविंद्र लाड, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, जितेंद्र गोसावी, मुकादम प्रदीप मोरे, विनोद पांडे आदी उपस्थित होते.

सायकल रॅलीत 30 सायकल स्वार सहभागी झाले होते, यामध्ये लहान श्रीईश तावरे-12 तर 63 वर्षाचे प्रकाश पटवर्धन ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता, या रॅलीत नगरसेवक बळवंत घुमरे तसेच नगरपरिषद कर्मचारी बाबूलाल उर्फ राजू वाघेला, प्रदीप हिरे, चेतन गायकवाड हे सहभागी झाले होते.

नगरसेवक बळवंत घुमरे यांनी सायकल चालवा आरोग्य मिळवा, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण असे सांगितले.ही रॅली कर्जत शहरात फिरली व पर्यावरणा बाबतजनजागृती केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.