रोहा-माणगांव स्थानकांवर अनेक एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा दिसणार
खासदार सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी
सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |
रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी दिवा-रोहा (MEMU) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर रोहा-पनवेल, रोहा-दिवा पॅसेंजर यासह नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा तसेच मांडवी एक्सप्रेसला व माणगांव स्थानकांवर ओखा एक्सप्रेस, बीकानेर एक्सप्रेस व मरुसागर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रामुख्याने केली.
याबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अनुकूलता दर्शवली असून रोहा-अष्टमी तसेच निडी खारपडी येथील दोन्ही पूलांच्या कामासाठी तात्काळ निधी देण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेख. या बैठकीस उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर, मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरद गोयल, महाव्यवस्थापकांचे सचिव साकेत मिश्रा उपस्थित होते.








Be First to Comment